मुंबई : सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असलेल्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांनी गवळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ऑगस्टच्या अखेरीस ईडीच्या अधिकाऱ्यांनी गवळींच्या वाशिममधील संस्थांवर धाडी टाकल्या. गवळी लोकसभेत वाशिम-यवतमाळ मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
ईडीच्या धाडींमुळे अडचणीत आलेल्या भावना गवळी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचल्या होत्या. मात्र त्यांना वर्षावर प्रवेश मिळाला नाही. गवळी जवळपास अर्धा तास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा करत थांबल्या होत्या. मात्र त्यांना भेटीसाठी वेळ देण्यात आली नाही. ठाकरेंकडून त्यांना कोणताही निरोपही दिला गेला नाही. त्यामुळे ताटकळलेल्या गवळी अखेर माघारी फिरल्या.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.