नाशिक शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा उडाला केला असून आगामी दिवाळी दसऱ्यापर्यंत स्मार्ट सिटी चे काम मार्गी लागले नाही तर शिवसेना स्टाईल जनआंदोलन करण्याचा निर्णय शिवसेना नेत्यांनी घेतला आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सराफ बाजार, भांडी बाजार, दहीपूल, मेन रोड च्या काही भागात स्मार्ट सिटीच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले आहे.Shiv Sena
ही काम अपूर्णच असल्याने मुख्य बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांबरोबरच व्यावसायिकही या स्मार्ट सिटीच्या संथ गतीने होणाऱ्या कामामुळे वैतागले आहेत.
केंद्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जुने नाशिकच्या गावठाण परिसरात उखडलेले रस्ते त्वरित दुरुस्त व्हावे आणि व्यवसायिक ग्राहक आणि रहिवाशांना या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आली.
या बैठकीला माजी आमदार वसंत गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, माजी नगरसेवक संजय चव्हाण, यांच्यासह ग्राहक, व्यवसायिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
मुख्यतः धुमाळ पॉईंट ते दहीपुलचा रस्ता गेल्या दहा महिन्यांपासून खोदल्याने इथल्या दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. या संथ गतीने होणाऱ्या कामाला अधिकाधिक गती देऊन हे काम दिवाळी दसऱ्यापर्यंत पूर्ण व्हावे अशी मागणी सीताराम कुंटे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं सांगण्यात आला आहे.Shiv Sena
Credits and copyrights – nashikonweb.com