विड्याच्या पानाचं भारताच्या इतिहासाशी आणि परंपरांशी खूप जुनं नात आहे. आजही भारताच्या प्रत्येक गल्लीत, चौकात किंवा मुख्य भागांमध्ये पानपट्टी हमखास दिसतेच. यावरून हेच कळतं की, विड्याचं पान हे फक्त भारतातल्या नवाब किंवा राजाचंच नाहीतर सामान्य शौकिनांचंही आवडतं आहे. जेवण झाल्यावर तोंडाची चव कायम ठेवण्यासाठी राजा-महाराजांच्या काळापासून अगदी आत्तापर्यंत सामान्य ‘शौकीन’ तरुणाईसुद्धा आजही पान खाणं मस्ट म्हणते. अश्या खास ‘शौकिन’ मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांना आता हे ‘शौकीन’ पान सहज- मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध होत आहे.
नुकतेच ‘शौकीन’ पानचे दादर शाखेचे उदघाटन झाले आहे.दादरच्या ‘शौकीन’चे उदघाटन मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. शर्मिला राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसेच्या रिटा गुप्ता, निर्माते – दिग्दर्शक – अभिनेते अजित भुरे, अभिनेत्री सविता मालपेकर, अभिनेते संजय मोने, विनय येडेकर, अतुल परचुरे, सखी परचुरे, अजीत रमेश तेंडुलकर, बीवायपीचे श्रीराम पाध्ये, दिग्दर्शक अजय फणसेकर, केतकर ज्युवेलर्सचे धनंजय केतकर, मा. नगरसेवक अश्विन शहा इत्यादी पान शौकीन मान्यवर उपस्थित होते.
पुण्यामधील एका ‘शौकीन’ अवलियाने २००५ साली अस्सल चवीच्या आपल्या पुणेकरांसाठी पाहिलं ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. शरद मोरे या ध्येयवेड्या माणसाने सर्वोत्कृष्ट अणि अत्यंत दर्जेदार तंबाखूरहित पानांचा स्वाद खऱ्या पानरसिकांच्या परिवारापर्यंत पोचविण्याचा विडा उचलून हे ‘कम्प्लीट पान शॉप’ सुरु केले. हजारो वर्षांची शाही परंपरा असलेल्या भारतीय पान संस्कृतीचा वारसा आणि स्वाद आपल्यासारख्या पान रसिकांपर्यंत पोहचविण्याचे ध्येय उराशी बाळगत त्यांनी आपला ‘शौकीन’ हा ब्रँड तयार करीत महाराष्ट्रातील पुणे, पंढरपूर, शिर्डी, खारघर असा विस्तार केल्यानंतर आता ते मुंबईत शिरकाव करीत आहेत. दादरमधील प्रसिद्ध सोन्याचांदीचे व्यापारी केतकरबंधूंना या ध्येयवेड्या ‘शौकीनाने’ मुंबईकरांसाठी हा विडा उचलण्यास भाग पाडले आहे.
खास लहान मुलांसाठी त्यांना आवडणाऱ्या टेस्टची पाने विकसित केली आहेत. ‘व्हॅनिला चॉकलेट पान’ ‘स्ट्रॉबेरी चॉकलेट’ ‘ड्रायफूट पान’ ,चॉकलेट मगई’ ‘ऑरेंज चॉकलेट’ अशी लहानग्यांना आवडणाऱ्या फ्लेवर्सची रेंज आमच्याकडे असणार आहे. इतकंच काय, ‘बर्थ डे सेलिब्रेशन पान’ आणि चक्क ‘फॅमिली पॅक’ही उपलब्ध आहेत. अगदी २० रुपयांपासून तब्बल साडेतीन हजारापर्यंतचं पान पाहायला मिळत आहे. मुलांसाठीची पानं कात आणि सुपारी न वापरता बनवली जातात, असं ‘शौकीन’ दादरचे संचालक केतकर म्हणाले.
The post ‘शौकीन पान’ मुंबईकरांच्या सेवेत दाखल. appeared first on Lokshahi News.
Credits and Copyrights – lokshahinews.com