मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसचे टिळक भवन या मुख्य कार्यालयाच्या प्रशासनिक समन्वयकपदी श्याम पांडे (Shyam Pandey) यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी प्रदेश कार्यालयातील सामान्य प्रशासन विभाग आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय स्थापित करुन पक्षाच्या कामाला गती देण्यासाठी व निवडणूक नियोजन, कंट्रोल रुम आदी कामासाठी श्याम पांडे यांचे अनुभव जाणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. श्याम पांडे यांच्याकडे किसान काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.