प्रसिद्ध गायिका छाया साखरे यांचा ‘इंडियन स्टार’ आणि राष्ट्र रत्न’ अवॉर्डने सन्मान करण्यात आला आहे. यानिमित्त छाया साखरे यांनी मिळालेल्या पुरस्कारांबद्दल त्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. यावेळी छाया साखरे यांनी हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन माझे कुटुंब, मित्रपरिवार आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा असल्याचे विधान केले.
रेडेसिड फिल्म ऑर्गनायझेशन ग्लोबल इंडिया डिवाइन इंडियन स्टार अवॉर्ड मुंबई आणि चंद्रकला चॅरीटेबल ट्रस्ट जयपुर ऑर्गनायझेशन “राष्ट्ररत्न अवार्ड” ने छाया साखरे यांना सन्मानित करण्यात आले. छाया साखरे यांनी राजकुमार तिवारी आणि चंद्रकला यांचे आपली निवड केल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी अनुप जलोटा, डॉ. हितेन तेज्वानी, कॉमेडियन सुनील पाल, ॲक्टर पृथ्वीसिंग उपस्थित होते.
क्लासिकल सिंगर्,बॉलीवुड प्लेबेक सिंगर,समाज सेविका, प्रख्यात अभिनेत्री,लोक नृत्य कोरिओग्राफर आणि मुंबई महानगरपालिका पालिका येथील स्पेशल संगीत शिक्षिका तसेच उत्तम म्युझिक डायरेक्टर अशा एक ना अनेक कौशल्याने परीपुर्ण अशी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या छाया साखरे यांना नुकतेच आदरणीय दादासाहेब फाळकेजी यांचे नातु चंद्रशेखर पुसाळकरजी आणि मशहुर साउथ ईडीयन अॅक्टर सुमन तलवारजी यांच्या हस्ते “लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड” ने सन्मानित केले आहे. याप्रसंगी मशहुर संगितकार अनु मलिकजी, मशहुर साउथ ईंडीयन एक्टर सुमन तलवारजी, प्रसिद्ध भजनसम्राट अनुप जलोटा, अॅक्टर मुकेश रीशी,गंजेंद्र चोहान, सिद्धार्थ निगम, अरुण बक्शीज,समाज सेवक अनिल मुरारका आदी कलाकारांची उपस्थिती होती.
Credits and Copyrights – lokshahinews.com