टीव्हीवरील ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मृती इराणी. अभिनेत्री स्मृती इराणी (smriti irani) आजजरी राजकारणात सक्रिय असल्या तरी त्यांची ओळख मालिकेतील एक संस्कारी सूनेच्या रूपात आणि टीव्ही स्क्रीनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणूनच केला जातो. सध्या स्मृती इराणी त्यांच्या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आल्या आहेत.
अभिनेत्री स्मृती इराणी यांनी नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचे नवे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमधील त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून त्यांनी सध्याच्या महामारीच्या काळात मास्क घालणं किती महत्त्वाचं आहे, हे पटवून दिलंय. हे फोटोज शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहीलीय. यात त्यांनी लिहिलंय, “सोमवार मंत्र, कानातले घाला, नाकातली घाला किंवा नका घालू, पण मास्क घाला. कारण आताही दोन हात अंतर आणि मास्क आवश्यक आहे.”
अभिनेत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेले फोटोज पाहून फॅन्स त्यांच्या वेट लॉस बद्दल चर्चा करीत आहेत. एका युजरने लिहिलंय, “जुन्या स्मृती बेन पुन्हा परतल्या आहेत.” त्यांच्या या नव्या ट्रान्सफॉर्मेशन लूकला पाहून अनेकांनी तर स्मृती इराणी पुन्हा कमबॅक करणार का? अशी उत्सुकता देखील व्यक्त केलीय.
Credits and Copyrights – lokshahinews.com