बिग बॉस विजेता व अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्याने (Sidhath Shukla death) अनेकांना धक्काच बसला आहे. फिटनेसची आवड असणाऱ्या चाळीसच्या व्यक्तीला असा अचानक हार्ट अटॅक (Heart attack) कसा येऊ शकतो, असा प्रश्न विचारला जात आहे. अनेकदा छातीवर प्रेशर आल्यानंतर ते पित्तामुळे आहे की हृदयविकारामुळे, हे आपल्याला समजत नाही. दैनंदिन जीवनामध्ये चुकीचा आहार घेतल्यामुळे, अनियमित व्यायाम अथवा अपुरी झोप आदी कारणांमुळे पित्त अथवा अॅसिडिटीचा (bile or Acidity) त्रास होतो, मात्र सतत होणाऱ्या अॅसिडिटीमुळे हृदयविकाराचा सौम्य झटका अथवा माइल्ड हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हे दोन्ही आजार गंभीर असल्यामुळे त्यावर वैद्यकीय सल्ल्याने उपचार घेणे गरजेचे असते. वेळेवर योग्य उपचार घेतल्यास व योग्य जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. अॅसिडिटी वाढल्यास रक्तदाब (Blood Pressure) वाढल्याचे दिसून येते. यामुळे सौम्य हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, परंतु या दोन्ही आजारांची लक्षणे व उपचार वेगवेगळे आहेत.
ज्या व्यक्तींना Acidity चा त्रास होतो त्यांनी हे पदार्थ टाळावेत
या आजारांची लक्षणे, त्यामधील फरक व उपाय यासंदर्भात चेस्ट फिजिशियन डॉ. रवी दोशी यांनी मार्गदर्शन केले आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्त ‘वेबदुनिया हिंदी डॉट कॉम’ने दिले आहे. ‘ज्या व्यक्तींना अॅसिडिटीचा सतत त्रास होतो, त्यांनी दैनंदिन आहारात तिखट पदार्थ शक्यतो टाळावेत. तसेच तळलेले पदार्थ खाणे टाळावे. हार्ट अटॅकच्या (Heart attack) रुग्णांनी तळलेले व फॅट वाढवणारे पदार्थ खाणे टाळावे, कारण तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे रक्त घट्ट होते,’ असेही तज्ज्ञ सांगतात. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे योग्य व मर्यादित व्यायाम तसेच योगा करावा, परंतु योगा अथवा व्यायाम करण्याआधी संबंधित रुग्णाचे हृदय किती कार्यक्षम आहे, हे तपासणे आवश्यक आहे. जर हार्ट फंक्शन (Heart Function) उत्तम असेल तरच संबंधित रुग्ण या बाबी करू शकतात. जर हृदयाची स्थिती नाजूक असेल, तर व्यायाम करणे घातक ठरू शकते.
Acidity व सौम्य हृदयविकाराचा झटका हे दोन्ही आजार वेगवेगळे आहेत
पोटामध्ये अॅसिडचे (Acids) प्रमाण वाढल्यामुळे अॅसिडिटीचा बऱ्याचदा त्रास होतो. Acidity झाल्यास पोटदुखी व पोटामध्ये जळजळ होते. सौम्य हृदयविकाराच्या झटक्यावेळी हृदयामधील एखादी शिर ब्लॉक होते. त्यामुळे रक्ताची गुठळी तयार होऊन हृदयाला होणारा रक्त पुरवठा थांबतो व वेदना जाणवू लागते. त्यामुळे अॅसिडिटी व सौम्य हृदयविकाराचा झटका हे दोन्ही आजार परस्पर वेगवेगळा आहे. त्यावरील उपचारसुद्धा भिन्न आहेत.
डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे
अॅसिडिटी झाल्यावर तुमच्या छातीच्या मध्यभागी वेदना जाणवू लागतात व ढेकर येतात, अपचन होऊन मलावरोध होतो. हृदयविकाराचा झटका आला असता, या संबंधित रुग्णाला हाताच्या उलट बाजूला वेदना जाणवते. ही वेदना अशी असते की, ज्यामुळे सर्व हाताला मुंग्या येतात. यावेळी जास्त घाम येतो व छातीमध्ये वेदना सुरू होतात. त्यामुळे या दोन्ही विकारांची लक्षणे ही अगदी वेगळी असतात व त्यावरील उपचारसुद्धा पूर्णपणे वेगळे असतात, मात्र अशी लक्षणे तुम्हाला जाणवल्यास संबंधित रुग्णाने त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.