अभिनेत्री स्मिता तांबे हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. स्मिता तांबेच्या घरी आता लवकरच छोटा पाहुणा येणार आहे. नुकताच स्मिता तांबेच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक स्पेशल व्हिडीओ तिने तिच्या फॅन्ससोबत सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या मैत्रिणींनी ‘गं कुणी तरी येणार येणार गं’ या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. स्मिता तांबेने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय.
अभिनेत्री फुलवा खामकर, रेशम टिपणीस, अदिती सारंगधर आणि अमृता सुभाष या चौघींनी एकत्र ‘गं कुणी तरी येणार येणार गं’ या गाण्यावर धम्माल डान्स केलाय. यावेळी स्मिता तांबे सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील एक्स्पेशन्सने मैत्रिणींच्या परफॉर्मन्समध्ये सहभागी होताना दिसून येत आहे. घरी बाळ येणार या आनंदाच्या भरात स्मिता तांबेचा पती विरेंद्र द्विवेदी सुद्धा थिरकताना दिसून आला. यावेळी प्रेग्नंसीमुळे स्मिताच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकत आहे. डोहाळे जेवण्याच्या दिवशी स्मिता खूपच गोड दिसत होती. हिरव्या रंगाचा ड्रेस तिला खुलून दिसत होता. महत्त्वाचं म्हणजे ती खूप आनंदी दिसत होती.
अभिनेत्री स्मिता तांबे हिने आतापर्यंत अनुबंध’,‘लाडाची लेक गं’ या मालिका, ‘तुकाराम’, ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘परतु’, ‘गणवेश’ यासारख्या अनेक चित्रपटात तिने आपल्या अभिनयाची जादू पसरवली. मराठी चित्रपटांसोबतच ‘सिंघम रिर्टन्स’, ‘रुख’, ‘नूर’, ‘डबल गेम’ या हिंदी चित्रपटांमध्ये तिने काम केलंय.

Credits and Copyrights – lokshahinews.com