काही दिवसांपुर्वी अभिनेता सोनू सूदने ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्याचं पोस्टर प्रदर्शित केलं होत. ‘साथ क्या निभाओगे’ हे गाणं आता प्रदर्शित झालं आहे.अल्ताफ राजा आणि टोनी कक्कड यांचं रीक्रिएटेड वर्जन असलेलं ‘साथ क्या निभाओगे’ सॉंग रिलीज होताच गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.या गाण्याने युट्यूबवर लाखो व्ह्यूजचा टप्पा पार केलाय.
या गाण्याचा व्हिडीओ आता पर्यंत ७८ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. या गाण्यात सोनूची एक वेगळीच झलक त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळतं आहे.दिग्दर्शक फराह खान हिने या गाण्याची कोरिओग्राफी आणि डिरेक्शन केलंय.
सोनू सूदसोबत ‘साथ क्या निभाओगे’ या गाण्यात निधि अग्रवाल आहे. हे गाणं टोनी कक्करने लिहिले आणि गायलं आहे. यूट्यूबवर हे गाणं खूप कमी वेळात १५ व्या क्रमांकावर आलं आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com