मुंबई : एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन करणारे एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेले असून ते राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या या मोर्चेकरऱ्यांना सध्या आझाद मैदानावरच अडवण्यात आलं आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आझाद मैदानावरील आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठी घोषणाबाजी सुरु आहे. सरकार आंदोलकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून आम्ही परबांच्या घरावर मोर्चा करणार काढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.
अनिल परब आणि कर्मचारी संघटनांसोबत बैठक सुरु असून त्यामध्ये कर्मचारी संघटना या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. दरम्यान, सध्या उपलब्ध पर्यायांपैकी खासगीकरण हा एक पर्याय आहे. पण त्यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. इतर राज्यांमधील परिवहन मंडळाचा अभ्यास करुन निर्णय घेऊ आणि याबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल तयार करण्याचं काम सुरु आहे असं अनिल परब यांनी या आधी स्पष्ट केलं आहे.
स्रोत : रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.