मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारो कर्मचारी ठाकरे सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणीही या आंदोलकांशी चर्चा करायला आलेले नाहीत. त्यामुळे, संपात सहभागी झालेले भाजपाचे नेते ठाकरे सरकारवर सातत्याने घणाघात करत आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आझाद मैदानात तळ ठोकून बसले आहेत. अनिल परब रोज तेच शिळं बोलत आहेत. त्यांच्याकडे सांगायला नवीच काहीच नाहीत. त्यांनी येऊन आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांशी बोलावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच आझाद मैदानावर बसलेले हे काय कुठले अतिरेकी आहेत का, असा थेट सवालही त्यांनी केला आहे.
तर, सदाभाऊ खोत यांनीही ट्विटवरुन भावनिक आवाहन केलंय. मित्रानो, एसटी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा…
मित्रानो, एसटी आणि जिल्हा परिषद शाळा वाचवा…
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) November 22, 2021
या दोनच गोष्टींना वाचवा कारण या दोनच गोष्टी गरिबांचा राहिले आहेत.
कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत.
या दोनच गोष्टींना वाचवा कारण या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिल्या आहेत. कोणतीही श्रीमंत व्यक्ती एसटीने प्रवास करत नाही आणि कुठल्याही श्रीमंत व्यक्तीची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिकत नाहीत, असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.