नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण- महाकवी वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने पु ल कट्टा, कल्याण तर्फे अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून, वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती आणि कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक महिला दिनानिमित्त, “वामनदादा कर्डक राज्यस्तरीय महिला विशेष काव्य वाचन स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा शनिवार दि: ५ मार्च रोजी, सार्वजनिक वाचनालय, शिवाजी चौक, कल्याण येथे जेष्ठ कवियत्री अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
स्पर्धेत केवळ महिलांना स्वरचित कविता सादर करण्याची संधी देण्यात येईल. स्पर्धकांना स्वरचित कवितेसोबत वामनदादा कर्डक यांची एक कविता सादर करणे अनिवार्य असून, गुणांकन करताना केवळ स्वरचित कवितेचा विचार केला जाईल. वामनदादा कर्डक यांची कविता आयोजकांकडून दिली जाईल. स्पर्धा निःशुल्क आहे. कवितेच्या विषयाचे बंधन नाही. कविता १६ ओळींहून अधिक मोठी नसावी. स्पर्धेत नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख १ मार्च आहे.
स्पर्धा, कल्याण सार्वजनिक वाचनालय सभागृहात दुपारी २ वाजेपासून सुरू होईल. स्पर्धकांनी दु. १.३०वा रिपोर्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी सायंकाळी ६ वा संपन्न होईल. विजेत्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येईल. तर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नाव नोंदणी करिता 9594562816 क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समिती, कल्याणचे सचिव सुधीर चित्ते यांनी केले आहे.