मुंबई : निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले आहेत. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
करणने आयोजीत केलेल्या पार्टीत एक आजारी व्यक्ती सहभागी झाली होती. त्यामुळे करीनाला कोरोना झाला अशी माहिती करीनाच्या प्रवक्त्याने दिली होती. परंतु, आशिष शेलार यांनी आता या पार्टीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
“करण जोहर याच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीतील सीमा खान, अमृता अरोरा आणि करीनाला कोरोना झाला अशा बातम्या वाचल्या. करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक होते? त्या सर्वांची टेस्ट झाली का? असे प्रश्न मी पालिकेला विचारले या पार्टीत किती लोक होते यावरून संशय निर्माण होत आहे.” असे मत शेलार यांनी व्यक्त केले आहे. शेलार म्हणाले, “मी पालिकेला विचारले की, तुम्ही रिजेसी नामक इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे का? त्यावेळी पालिकेकडून नाही असे उत्तर आले. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होते का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्यांनी पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होते का त्याची स्पष्टता असावी.” असे शेलार म्हणाले.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.