मोबाइल विश्वात आणि त्याद्वारे संपूर्ण जगभरात क्रांती घडवून आणलेले तंत्रज्ञ अशी स्टीव्ह जॉब्ज यांची ओळख आहे. स्टीव्ह जॉब्जने कार्यपद्धतीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत. दरम्यान या स्टीव्ह जॉब्ज यांनी स्वतःला जॉब मिळवण्यासाठी ऑफलाइन स्वरूपात, स्वतःच्या हाताने अर्ज लिहला होता.
त्या काळाचा विचार करता यात काही नवल नाही; मात्र जॉब्ज यांनी पुढे केलेल्या कार्यामुळे त्यापूर्वीच्या त्यांच्या या कृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वतः हाती लिहिलेल्या अर्जाचा नुकताच लिलाव झाला आणि त्याला तब्बल 34300 डॉलर्स म्हणजेच 2.5 कोटी रुपये एवढी मोठी किंमत मिळाली.
स्टीव्ह जॉब्ज 18 वर्षांचे होते तेव्हा म्हणजेच 1973 साली त्यांनी नोकरीसाठी केलेला हा अर्ज आहे. एका वृत्तानुसार, त्यांच्या आयुष्यात त्यांनी नोकरी मिळण्यासाठी केलेला हा एकमेव अर्ज असल्याचं सांगण्यात येतं. आयुष्यातली पहिली नोकरी मिळवताना प्रत्येकाच्या मनात जे चालू असतं, तेच जॉब्ज यांनीही अनुभवलं होतं.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.