आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर सध्या त्या एका ऑनलाईन फ्रॅाडमुळे चर्चेत आल्या आहेत.एका एनजीओला मदत करताना त्यांची ती मदत दुसऱ्याच एका संस्थेला गेल्याचे दिसून आले आहे. त्याबद्दल त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
#FraudAlert I made a donation through the official website of @SightsaversIN on the provided link of @Paytm.The money was debited from my paytm linked account but the receiver seems to be a fraud Ecommerce site.The NGO @SightsaversIN claims to have not received it. @Sightsavers
— Supriya Pilgaonkar (@sspilgaonkar) August 8, 2021
सुप्रिया पिळगांवकर यांनी सांगितलं की, त्यांनी साईट सेव्हरसीन नावाच्या एका एनजीओला मदत केली. त्यांनी ही मदत आर्थिक स्वरुपात केली. यासाठी त्यांनी काही रक्कम ही त्या संस्थेच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली. ती रक्कम त्या संस्थेला पोहचल्याचा मेसेजही त्यांना त्यांच्या पेटीएमवर आला. त्यानंतर त्यांनी संबंधित एनजीओशी संपर्क साधला असता त्या संस्थेनं अद्याप आपल्याला ती मदत मिळाली नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ती मदत दुसऱ्या एका अकाउंटला गेल्याचे अभिनेत्री सुप्रिया यांचे म्हणणे आहे.
त्यावर त्यांनी नागरिकांना यापुढे कुणालाही मदत पाठवताना आपण ज्या संस्थेचं नाव नमुद करतो आहोत ते पुन्हा एकदा तपासण्याची विनंती केली आहे. आपल्याकडून घाईत ट्रान्झेक्शन करताना काही राहून गेल्याचं त्यांनी यावेळी ट्वीटमधून सांगितलं आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com