आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी T20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या T20 वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संधी कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. अखेरीस आयसीसीन या सर्वांवरील पडदा हटवला अन् आज संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.
सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.
पात्रता फेरीत सहभागी संघ
गट १ – श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅन्ड, नामिबिया
गट २ – बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान
पात्रता फेरीचं वेळापत्रक
१७ ऑक्टोबर – ओमान वि. पपुआ न्यू गिनी आणि बांगलादेश वि. स्कॉटलंड
१८ ऑक्टोबर – आयर्लंड वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. नामिबिया
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. बांगलादेश
२० ऑक्टोबर – नामिबिया वि. नेदरलँड्स आणि श्रीलंका वि. आयर्लंड
२१ ऑक्टोबर – बांगलादेश वि. पपुआ न्यू गिनी आणि ओमान वि. स्कॉटलंड
२२ ऑक्टोबर – नामिबिया वि. आयर्लंड आणि श्रीलंका वि. नेदरलँड्स
सुपर १२ फेरीतील संघ
गट १ – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता.
गट २- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.
This post has been created via RSS feed. No copyright is held by us. If it is your content contact us and let us know we will Give proper credits. Or we will take it down.