तामिळ सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री चित्रा यांचे वयाच्या ५६व्या वर्षी निधन झाले आहे.हृदयाची क्रिया बंद पडल्याने निधन झाल्याचे कळते आहे.चेन्नईमधील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मल्याळम आणि तमिळ भाषेतील १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या छोट्या पडद्यावरील तमिळ मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. पण २१ ऑगस्ट रोजी आर्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे.चित्रा यांनी ८०च्या दशकात अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी जवळपास तिन दशक इंडस्ट्रीमध्ये काम केले.
चित्रा यांचा जन्म २१ मे १९६५ साली केरळमधील कोच्ची येथे झाला होता. त्यांचे ‘अट्टाकलशम, ‘कमिश्नर, ‘पंचागनी’, ‘देवसुरम’, ‘अमरम’, ‘एकलव्यन’, ‘रुद्राक्षम’ आणि ‘मिस्टर बटलर’ हे चित्रपट हिट ठरले.
Credits and Copyrights – lokshahinews.com