टाटा मोटर्स (Tata Motors) आपली एक बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये टाटा भन्नाट कामगिरी करत आहे. टाटा समूहाच्या बऱ्याच कंपन्या गुंतवणूकदारांना उत्तम रिटर्न्सदेखील देत आहेत. यामध्ये टाटा मोटर्सचाही समावेश आहे. अलीकडील काळामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) ग्राहकांकरिता इलेक्ट्रिक आणि अन्य सेगमेंटमध्ये चांगल्यात चांगली कार सादर करत आहे. इतकेच नाही, तर इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये Tata कार्सचा बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे बिघडले आहे. याचा परिमाण म्हणजे बऱ्याच लोकांनी इलेक्ट्रिक व सीएनजीवर चालणाऱ्या तसेच कमी खर्चामधील गाड्यांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. पैशांची बचत होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची डिमांड वाढत आहे. अशामध्ये बऱ्याच कार कंपन्या ग्राहकांची गरज ओळखून CNG व्हर्जनमध्ये आपल्या car आणत आहेत. टाटा मोटर्स आपली selling hatchback car टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. काही डिलरशिप्समध्ये नवीन टियागो सीएनजीकरिता अनधिकृत बुकिंग स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
टाटा मोटर्सच्या या नवीन कारमध्ये हे फिचर्स
ग्राहक पाच हजार रुपयांच्या टोकन अमाऊंटवर निवडक टाटा डिलरशिप्समधून (Tata Dealerships) ही कार बूक करू शकतात. दिवाळीपर्यंत Tata Motors ची नवीन टियागो सीएनजी लाँच होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सची नवीन Tiago CNG ही कार Testing दरम्यानही स्पॉट झाली होती. Tata टियागो सीएनजी कारच्या फिचर्स व स्पेसिफिकेशन्ससंदर्भात माहिती लीक झाली होती. कंपनीने ही नवीन CNG कार सध्याच्या टियागोपेक्षा वेगळी दिसावी याकरिता एकदम नवीन बंपर, क्रोमसह नवीन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी डीआरएल, आकर्षक एलईडी टेल लाइट्स, असे फिचर्स (Features) दिले आहेत.
टाटाची ही छोटी व स्वस्त कार जबरदस्त
याव्यतिरिक्त ॲपल कार-प्ले व अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होणारी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायपरसोबत रिअर डिफॉगर असे फिचर्सदेखील या कारमध्ये मिळतील. Tata Tiago CNG १.२ लिटर रेवोट्रॉन इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये सध्या विक्री होत असलेली Tiago ही सेगमेंटमधील सगळ्यात सुरक्षित कार असल्याचा कंपनी दावा करते. त्याप्रमाणे टियागो सीएनजीसुद्धा सुरक्षेच्या संदर्भात दमदार असेल. मार्केटमध्ये सध्या विक्री होणाऱ्या टाटा टियागो (Tata Tiago) कारला NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये या कारला चार स्टार रेटिंग मिळाले आहे. या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) व अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), रिअर पार्किंग सेन्सर, ड्युअल फ्रंट एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टिम व कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, असे फिचर्स (Features) मिळतात. सुरक्षेच्या संदर्भात टाटाची ही छोटी व स्वस्त कार जबरदस्त आहे.
ह्युंडाई आय-टेन सीएनजी अशा शानदार कारसोबत टक्कर
टाटा टियागो सीएनजीमध्ये (TataTiago CNG) हे सर्व सेफ्टी फिचर्स मिळतील. या कारच्या किमतीबद्दल कंपनीने अद्याप काही घोषणा केलेली नाही, मात्र मार्केटमध्ये सध्या उपलब्ध असलेल्या टियागोपेक्षा CNG व्हर्जनची किंमत किमान एक लाखापर्यंत अधिक असण्याची शक्यता आहे. सध्याच्या टियागोची बेसिक एक्स शोरूम किंमत ४.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिअंट (variants) ची किंमत ७.०५ लाखांपर्यंत जाते. लाँच झाल्यानंतर या कारची मारुती वॅगनआर सीएनजी, मारुती सिलेरियो सीएनजी, ह्युंडाई आय-टेन सीएनजी, अशा शानदार कार्ससोबत टक्कर असेल.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.