जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलत होत्या. जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव यावेळी सभेत करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार, सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला असून, तो लवकरच ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही शालिनीताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून, शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल, अशी टीका त्यांनी केली. काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा मोठा दावा पाटील यांनी केला.
This post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.