ठाणे महापालिकेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी गर्दी टाळण्यासाठी कालबद्ध नोंदणी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मूर्ती विसर्जनासाठी जाण्यापूर्वी विसर्जनाची जागा, तारीख आणि वेळ ऑनलाईन बुक करावी लागेल. यासाठीची सुविधा 1 सप्टेंबरपासून सुरू होईल.
संभाव्य तिसऱ्या लाटेची अटकळ लक्षात घेऊन, गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी डिजीथेन प्रणालीद्वारे ऑनलाईन वेळ नोंदणी सुविधा देण्याचा निर्णय यावर्षी तसेच महापौर, ठाणे महानगरपालिका, नरेश म्हस्के आणि ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा. गेल्या वर्षी 11,000 हून अधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला होता.
ठाणे महापालिकेने यंदा गणेश विसर्जनासाठी 33 जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. DigiThane द्वारे मूर्ती विसर्जनासाठी ऑनलाईन वेळ नोंदणी सुविधा 13 कृत्रिम तलाव आणि 20 मूर्ती स्वीकृती केंद्रांवर उपलब्ध असेल. यासाठी पालिकेने सर्वांना विसर्जनाची वेळ http://www.ganeshvisarjan.covidthane.org/ या संकेतस्थळावर नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
विसर्जन स्लॉट कसे बुक करावे?
१) सन २०२१च्या गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण 33 स्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये १३ कृत्रिम हौद/तलाव आणि २० मूर्ती स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन नागरिकांनी त्यांच्या घराजवळचे मूर्ती विसर्जन स्थान व वेळ निश्चित करावी.
2)ही सुविधा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर आधारित आहे.
३)विसर्जन कालावधी या दिवसांसाठी खुले आहेत

४) प्रत्येक विसर्जन दिवशी दुपारी १४.३० वाजेपासून रात्री २१.३० वाजेपर्यत प्रत्येक विसर्जन स्थळी २० मिनिटांचे २१ विसर्जन स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
५) संबंधित नागरिकाने निश्चित करण्यात आलेल्या कालावधीच्या ३० मिनिटे आधी विसर्जन केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
६)विसर्जन कालावधी यशस्वीरित्या निश्चित केल्यानंतर संबंधित नागरिकाला युनिक सिरीयल नंबर, ठिकाण आणि विसर्जन कालावधीची वेळ इत्यादी माहिती QR कोडसह पाहता येईल . संबंधित नागरिकाने ही रिसीट डाउनलोड करावी. सदर रिसीट विसर्जन केंद्रावरील कर्मचाऱ्यांना दाखवणे आवश्यक आहे.
७) अर्जदाराला युनिक सिरीयल नंबर, ठिकाण आणि विसर्जन कालावधीची वेळ QR कोडसह SMS द्वारेही प्राप्त होईल. नागरिकांना विनंती आहे की सदर SMS त्यांच्या नियोजित गणेश विसर्जन दिवसापर्यंत जतन करावा.
८) नागरिकांनी आपला विसर्जन कालावधी काळजीपूर्वक निश्चित करावा. निश्चित करण्यात आलेला कालावधीत बदल अथवा रद्द करता येणार नाही,याची कृपया नोंद घ्यावी.
९) विसर्जन कालावधी खालील प्रमाणे नियोजनानुसार खुले करण्यात येतील किंवा अद्ययावत करण्यात येतील.
१०.१) प्रत्येक गणेशमूर्ती समवेत जास्तीत जास्त तीन लोक असावीत.
१०.२) श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरीता ४ फूट व घरगुती गणपती करिता २ फूटांच्या मर्यादेत असावी.
१०.३) विसर्जन स्थळी श्रींची आरती करण्यास सक्त मनाई आहे, याची कृपया नोंद घ्यावी!
११) नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारकआहे.
१२) विसर्जनाच्या वेळी एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक आहे.
१३) सतत आपल्या सोबत सॅनिटायझर असावे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा.
१४) कधी कधी एकाच वेळी अनेक नागरिक या संकेतस्थळाचा वापर करू शकतात. त्यामुळे संकेतस्थळावर ताण येऊन संकेतस्थळाची गती मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
१५) एक मोबाईल क्रमांकावरून फक्त एक नोंदणी करता येईल. आपल्याला आणखी एखादा विसर्जन कालावधी निश्चित करायचा असल्यास दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून नोंदणी करावी लागेल.
१६) ठाणे महानगरपालिका आणि शासनाच्या वतीने वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले नियम, अटी, मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करणे सर्व नागरिकांसाठी बंधनकारक आहे.
Disclaimer- वरील सूचना http://www.ganeshvisarjan.covidthane.org/ वरून कॉपी केली गेली आहे (Thane Ganpati Visarjan Slot Booking)