ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना कोरोनाच्या लढाईत २०० कोटींचा खर्च झाला आहे. दरम्यान महापालिकेने शासनाकडे तब्बल २०० कोटींच्या अनुदानाची मागणी करूनही फक्त १० कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे पालिकेची परिस्थिती आणखी खोलात जाण्याची चिन्हे आहेत.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ठाणेकरांवर आर्थिक संकट कोसळले असल्याने शहरातील आर्थिक उलाढालच मंदावली आहे. परिणामी दोन वर्षात ठाणे महापालिकेच्या सर्वच विभागाचे उत्पन्न घटले आहे. केवळ मालमत्ता आणि पाणीपट्टी वगळता इतर विभागामध्ये अपेक्षित उत्पन्न तर मिळाले नाहीच मात्र उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. पालिकेने कोरोनावर आतापर्यंत तब्बल २०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
कोरोनावरील उपचारांमुळे ठाणे महापालिकेचा पाय खोलात
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि रुग्ण उपचारासाठी ७१० कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार केले होते. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना आणि रुग्ण उपचारासाठी पालिकेने आतापर्यंत २३३ कोटी रुपये खर्च केले आहेत. महापालिकेने अनुदानापोटी २०० कोटी रुपये देण्याची मागणी राज्य शासनाकडे यापुर्वीच केली आहे. त्यापैकी महापालिकेला दहा कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे. तर, उर्वरित रक्कम अद्याप मिळाली नाही. हि रक्कम मिळविण्यासाठी पालिकेकडून पाठपुरावा सुरु असला तरी त्याला राज्य शासनाकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
सिडकोने १७ कोटी, एमएमआरडीएने २५ कोटी रुपये पालिकेला अनुदान दिले आहे. यातूनच पालिकेने शहरात कोरोना रुग्णालये उभारली आहेत. राज्य शासनाकडून पालिकेला २३० कोटी रुपये मुद्रांक शुल्काची रक्कम अद्याप मिळाली नाही. हे अनुदान मिळत नसल्यामुळे महापालिकेच्या अडचणीत भर पडत आहे.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.