ठाणे : स्वच्छता, आरोग्य, सुरक्षितता याबाबतचे नियम पायदळी तुडवून मांसविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सुमारे ५८० दुकानदारांना जुजबी शुल्क आकारून व्यवसायाची परवानगी देण्याचा प्रस्ताव सोमवारच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
सध्या ठाणे महापालिका हद्दीत ९५० मांस विक्री केंद्रे असून यापैकी केवळ ३७० दुकानांना मांस विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित ५८० दुकाने ही अनधिकृतवणे मांस विक्री करत असल्याची माहिती पालिका प्रशासनानेच जाहीर केली आहे. जे मांस विक्री दुकानदार अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. या सर्व दुकानांकडून वार्षिक दोन लाखांचा दंड आकारून त्यांना व्यवसाय करू दिला जात आहे. अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्यांपैकी ३९० दुकाने अशी आहे कि ज्यांना नियम आणि अटींच्या आधारे परवानगी देणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अशी दुकाने गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिका हद्दीत व्यवसाय करत असून काही दुकानांनी मालमत्ता कर देखील भरलेला नाही. परिणामी ठाणे महापालिकेचे दुहेरी नुकसान होत असून अशा दुकानांकडून नियम आणि अटीशर्थीची पूर्तता होईपर्यंत त्रुटींवर शुल्क आकारून या दुकानांना परवानगी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आला. हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
अटी-शर्तीची पूर्तता होईपर्यंत या दुकानदारांना अटी तसेच शर्तीच्या प्रत्येक त्रुटीनुसार शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्याचे दरही पालिकेने निश्चित केले आहेत. शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत हे शुल्क आहे. ५० मीटर त्रिजेच्या परिसरातील धार्मिक स्थळ, कार्यशाळा किवा शैक्षणिक संस्थेला तसेच पाच मिटर अंतरात दुकानाच्या बाजूला केश कर्तनालय, कोळशाचे दुकान, पिठाची गिरणी, दवाखाना नसणे या अटी आणि शर्ती शिथील करून त्रुटीची कमतरता असलेल्या दुकानांना परवाना देताना त्यांच्याकडून त्रुटी शुल्क वसुल केले जाणार आहे, असेही पालिकेने प्रस्तावात म्हटले होते. या प्रस्तावानुसार बेकायदा दुकांना एकप्रकारे अभय दिले जाणार असल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टिका होत होती. या प्रस्तावावर लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु सोमवारी हा विषय चर्चेला येताच सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोणत्याही चर्चेविनाच हा प्रस्ताव मंजुर केला.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.