डोंबिवली – डोंबिवलीत शाळेच्या बस लावलेल्या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे. विद्यानिकेत शाळेच्या बसवर डोंबिवलीकर स्टाईलने प्रशासनाला जाब विचारण्यात आलाय .कोरोना काळातील मनमानीवर टीका करताना थेट लोकशाही हरवली आहे, अशा आशयाचे बॅनर शाळेच्या बसवर प्रसिद्ध केला आहेत. सर्व सामन्यांच्या मनातील खदखद आहे ती शाळेतल्या पालकांच्या बोलण्यातून जाणवतंय ते शाळेने आपल्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं शाळेचे व्यवस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले
सर्व सामान्यांच्या मनातील खदखद आहे. ती आम्ही शाळेच्या बसवर बॅनर लावून मांडली आहे. जन सामान्य कोरोनामुळे आवश्यक ते नियम पाळत आहे. प्रशासनाने जे कर्तव्य करायले पाहिजे. नागरीकांच्या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. ते हल्ली होत नाही. सरकारी कार्यालयात आत जाता येत नाही गेले तरी अधिकारी भेटत नाही. इनव्हर्डला लेटर द्या आम्ही बघतो म्हणून सांगतात. शहराच्या समस्या तशाच राहतात. जनतेवर नवे नियम लादले जातात मात्र जनतेला विचारत नाही. सात ते 2 ही दुकानाची वेळ ठेवली होती ती खरंच योग्य आहे का ? शाळा आज उद्या उघडणार हे तळ्य़ात मळयात सुरु आहे तो निर्णय शाळा आणि पालकांना ठरवू द्या. सगळे डिसिजन मेकिंग प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतले आहे.लोकप्रतिनिधी नाहीत. प्रशासकीय कारभार सुरु आहे. सरकारने घेतलेले निर्णय हे तळातील लोकान पर्येंत यायला वेळ लागतो . लोकशाहीत असे असून चालत नाही .याचे दुख आहे. म्हणून आम्ही म्हटले आहे की, लोकशाही गेली कुठे आम्ही लोकशाही शोधतोय असे विद्यानिकेतन शाळेचे प्रमुख विवेक पंडीत यांनी सांगितले.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This Post has been retrieved from the RSS feed. contact for further details of Discussion. We do not own or take copyrights of this post.