पडघा : जनआशिर्वाद यात्रेवेळी भिवंडी तालुक्यातील भोईरगांव येथे उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले.
आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा. येथे क्लिक करा.
केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपील पाटील यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नांगरीकांचे आशिर्वाद घेण्यासाठी जनआशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मुरबाड शहापुर तालुक्यातुन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर ही यात्रा भिवंडी तालुक्यात आली. ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती श्रेया गायकर, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष व पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली भोईरगांव बस स्टॉपजवळ बॅंड, तुतारी, ढोल ताशा व तारपा नृत्याच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कुकसे भोईरगांव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे उद्घाटन व एमएमआरडीएच्या माध्यमातून ११ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या भोईरगांव- सावाद रस्त्याचे कोनशिला अनावरण, गरीबांना धान्यवाटप कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती श्रेया गायकर, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष व पडघा सोसायटीचे सभापती श्रीकांत गायकर,जिल्हा परिषद सदस्य दयानंद पाटील, पंचायत समिती सदस्य गुरूनाथ जाधव, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते व पडघा शहर पदाधिकारी व कार्यकर्ते, कुकसे ग्रामपंचायत सरपंच सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते. तर दत्तात्रय पाटोळे, दशरथ पाटील, दयानंद पाटील, सुरेंद्र पाटील, संतोष जाधव, अविनाश राऊत, भरत पाटिल, शांताराम पाटिल, काका पाटील, गुरूनाथ जाधव, राम शेलार, विनोद पाटील, रवीना जाधव, विजू गायकर, अजय पाटील, लक्ष्मण गोष्टे, किरण वरघडे, अविनाश पातकर, अशोक शेरेकर,नीलकंठ विशे, संदीप कठोले, निलेश देसले,जगदीश कोर, पांडू पाटील, नामदेव पाटील, राम बजागे, अशोक पाटील, सरपंच कमला पाटील,भरत पाटील,उपसरपंच निलम भोईर ,अभिषेक नागावेकर ग्रामसेवक भास्कर घुडे,उद्योगपती पद्माकर भोईर, संतोष भोईर दत्तात्रय पाटोळे, पांडुरंग पाटील,सह भाजपाचे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी केले.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.