ठाणे : शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा ५०च्या आत आला आहे. ४८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ५६जण कोरोनामुक्त झाले आहेत. वागळे आणि मुंब्रा या प्रभाग समिती क्षेत्रात शून्य रुग्णांची नोंद झाली आहे तर सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू आज झाला नाही.
महापालिका क्षेत्रातील माजिवडे- मानपाडा आणि वर्तकनगर या दोन प्रभाग समितीमध्ये दोन आकडी म्हणजे अनुक्रमे १२ आणि १८ रुग्णांची नोंद झाली आहे. प्रत्येकी एक रूग्ण दिवा आणि लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये नोंदवले गेले आहेत. उथळसर येथे आठ, कळवामध्ये पाच आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती भागात तीन रूग्ण वाढले आहेत.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ५६जण कोरोनामुक्त झाले असून आत्तापर्यंत एक लाख ३५ हजार ५५५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ६१५जणांवर उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत दोन हजार ८७जण दगावले आहेत.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील तीन हजार १२३ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये ४८जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत १९ लाख ५५ हजार ७०७ ठाणेकरांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ३८ हजार २५७जण बाधित सापडले आहेत.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.