उल्हासनगर : चॉकअप होणाऱ्या अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये उतरून त्यातील सफाई करताना महाराष्ट्रात अनेक सफाई कामगार जीवास मुकले आहेत.यावर तोडगा म्हणून रिजन्सी ग्रुप, टाटा एआईजी, टाटा ट्रस्ट यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला ड्रेनेज क्लिन करणारा रोबोट दिलेला आहे. हा रोबोट लवकरच कार्यान्वित होणार असल्याने कामगारांचे ड्रेनेजमध्ये उतरण्याचे संकट टळले आहे. पाणी पुरवठा विभागाचे उपआयुक्त डॉ.सुभाष जाधव यांनी ही माहिती दिली.
शहरात वसाहतीच्या मधून जाणाऱ्या आणि मुख्य रोडच्या बाजूला 1830 अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत.त्यात चॉकअपची तक्रार आल्यावर ड्रेनेज साफ करणारी गाडी आतमध्ये पाईप टाकून ड्रेनेज साफ करत होती. प्रसंगी कामगारांना ड्रेनेजच्या आत उतरावे लागत होते. आता रोबोटमुळे कामगारांवरील संकट टळणार आहे. रोबोटच्या माध्यमातून रोज 200 चॉकअप ड्रेनेज क्लिन करण्याचे लक्ष असल्याचे डॉ.सुभाष जाधव यांनी सांगितले.
7 सप्टेंबर रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उल्हासनगरातील बाळासाहेब ठाकरे मिनी स्टेडियमचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी रिजन्सी ग्रुप, टाटा एआईजी, टाटा ट्रस्ट यांनी पालिकेला अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या सफाईसाठी दिलेल्या रोबोटचे ऑनलाईन उद्घाटन शिंदे यांनी केले. तेंव्हा रोबोट कसा ड्रेनेजमध्ये जाणार, त्याचे दोन हात कसे चॉकअप काढणार ही चित्रफीतही स्क्रिनवर दाखवण्यात आली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर लिलाबाई आशान, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आयुक्त डॉ.राजा दयानिधी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, कुमार आयलानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, नगरसेवक धनंजय बोडारे,अरुण आशान, कलवंतसिंग सोहता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवर, पालिका अधिकारी अवाक झाले होते. चित्रफीत बघितल्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिजन्सी ग्रुपचे महेश अग्रवाल, उद्धव रुपचंदानी, अनिल बठीजा, टाटाच्या ग्रुपचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले होते.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.