शिक्षक दिनाचे निमित्त इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रेडिओलॉजिस्ट संघटनेतर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रा. अशोक प्रधान यांच्या हस्ते शिक्षणाच्या कार्यासह सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षिकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यासाठी आघाडीवर असणाऱ्या इंडियन मेडीकल असोसिएशन आणि रेडिओलॉजिस्ट असोसिएशन कल्याणतर्फे या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिर्ला महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रंजना जांगरा, बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार, आसनगाव जिल्हा परिषद शाळेच्या सरिता काळे, टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्थेच्या अक्षता भोसले, सामाजिक कार्यकर्त्या शशी शेट्टी यांचा आयएमए कल्याणकडून कै. मधूलिका कक्कर शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शिक्षक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमधील मुलांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या सामाजिक कार्यासाठी कल्याणातील हेरिटेज हॉटेलचे प्रविण शेट्टी यांनी जागा उपलब्ध करून देत आपलाही हातभार लावला.
कोरोना काळात समाजात निर्माण झालेली एकतेची वीण आणि सामाजिक नाळ यापूढेही अशीच कायम राहावी अशी अपेक्षा यावेळी प्रा. अशोक प्रधान सरांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाला आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. हरीश शहाददपुरी, डॉ. संदेश रोठे यांच्यासह डॉ. सुरेखा इटकर, डॉ. अश्विन कक्कर आदी डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This Post has been retrieved from the RSS feed. contact for further details of Discussion. We do not own or take copyrights of this post.