ठाणे : ठाण्यातील वाहतूक कोंडीबाबत राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. एमएसआरडीसीने तत्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी; तोपर्यंत शहरातून होणारी अवजड वाहतूक थांबवावी. अन्यथा ठाण्यात येणारी अवजड वाहतूक बंद पाडेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्याविरोधात ठाणेकरांमध्ये आक्रोश आहे. या आक्रोशाला राष्ट्रवादी काँग्रेसने वाचा फोडली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे आणि ठामपा गटनेते नजीब मुल्ला यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात आनंद परांजपे यांनी, ठाणे शहरातील रस्त्यांची निगा राखण्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडून पार पाडली जात नाही. महापौर रात्रीच्या अंधारात गणेशोत्सवाचे विसर्जन होत असताना साचलेल्या पाण्यामध्ये डांबर टाकून खड्डे बुजवायचा प्रयत्न करीत होते. राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी अत्यंत परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. अनेक वर्षांपासून कोस्टल रोड, फॉरेस्ट रोड, मोघरपाडा येथील पूल ही कामे ठामपा आणि एमएसआरडीसीमधील समन्वयाअभावी रखडलेली आहेत. जर, एमएसआरडीसी, एमएमअआरडीए, ठामपा आणि पालकमंत्री यांच्या स्तरावर निर्णय झाले असते तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकल्प मार्गी लागले असते, हे नजीब मुल्ला यांनी उघडकीस आणले आहे.
वाहतूक कोंडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
ठाण्याला आज पर्यायी रस्त्याची गरज आहे. कोपरी पूल तयार आहे; त्याच्या दर्जाबाबत ठाणेकरांना देणेघेणे नाही. जर हा पूल तयार झाला आहे तर तो ठाणेकरांसाठी खुला करायला हवा आहे. ठाण्यात मेट्रोची कामे सुरु आहेत. ठाण्यातील उड्डाणपुलांवर खड्डे आहेत. हे उड्डाणपुल एमएसआरडीसीचे आहेत. ठामपा आणि एमएसआरडीसीमध्ये ताळमेळ नाही. ते एकमेकांकडे बोटे दाखवतात. त्यामुळे ठाणेकरांचे हाल होत आहेत. हाय-वे ची जबाबदारी एसआरडीसीकडे आणि अंतर्गत रस्त्यांची जबाबदारी ठामपाकडे आहे. एमएसआरडीसी खाते शिवसेनेकडे आहे आणि ठामपातही शिवसेनेची सत्ता आहे. ठामपात सेनेला स्पष्ट बहुमत आहे. राष्ट्रवादीची गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले होते. त्यामुळे या खड्ड्यांची जबाबदारीही शिवसेनेचीच आहे. कामाचा दर्जा तपासणे ही जबाबदारी शिवसेनेची आहे. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता देण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. पालकमंत्र्यांननी स्वत: लक्ष घालून ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी; अन्यथा, मुलुंड टोल नाका, खारीगावा टोल नाका आणि गायमुख या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन ठाण्यात येणारी अवजड वाहनांची वाहतूक रोखून धरेल. ठाण्यात एकही अवजड वाहन येऊ देणार नाही, असा इशारा दिला.
ठाणे शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 व 8 हे मुख्य महामार्ग जातात. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची सतत ये-जा सुरु असते. सद्यस्थितीमध्ये या रस्त्यावर मोठ-मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या खड्ड्यांमुळे रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.