ठाणे : इंधन दरवाढ आणि अवकाळी पाऊस यामुळे भाज्या चांगल्याच कडाडल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा आणि मटारने तर चिकनपेक्षा जास्त भाव खाल्ल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी पाठ केल्याचे दिसत आहे.
महागाईमुळे स्वयंपाक घरात सर्वसामान्य गृहिणीच्या डोळ्यात पाणी आले आहे. आमटी, डाळ, सांबरची चव वाढवणारी तसेच कोरोनाच्या काळात अत्यंत गुणकारक असलेली शेवग्याची शेंग बाजारात ३८० ते ४०० रुपये किलो दराने विकली जात आहे. आजच्या घडीला सर्वात महागडी भाजी म्हणून शेवग्याची शेंग भाव खात असल्याने जेवणाच्या ताटातून ती हद्दपार होऊ लागली आहे.
भाजी मंडईत सकाळी वाशी, नाशिक, कल्याण येथील मार्केटमधून भाजीपाल्याची आवक होत असते, परंतु इंधन दरवाढ व अवकाळी पाऊस यामुळे सर्वच भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यात कोरोना काळात लोक आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत, त्यामुळे शरीरासाठी पौष्टीक अशा भाज्या खाण्याकडे लोकांचा जास्त कळ वाढू लागला आहे.
आरोग्यवर्धक आणि पदार्थाची लज्जत वाढवणाऱ्या शेवग्याच्या शेंगा काही दिवसांपूर्वी 100 रुपये किलोने विकल्या जात होत्या. मात्र सध्या ह्याच शेंगा ३८० व ४०० रुपये दराने विकल्या जात आहे. तर मटार २०० रुपये किलोने विकली जात आहे. सुरुवातीला आठवड्याच्या भाज्या विकत घेत होतो, परंतु आता मात्र फक्त १ ते २ दिवसाच्या भाज्याच विकत घेतो, ते ही पाव किलो ते अर्धा किलो अशा घेतो, असे ग्राहक सांगत आहेत. भाज्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे भाजी विक्रेतेही यामुळे चिंतेत आहेत. अशा महागड्या भाज्यांच्या खरेदीतकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.