ठाणे : ठाणे महानगरपालिकेने पदपथावरील सोडियम व्हेपरचे दिवे बदलून एलईडी दिवे लावल्याने महापालिकेची वार्षिक १२ कोटींची बचत झाली आहे.
शहरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून मार्ग काढण्यासाठी पदपथावर ४२ हजार सोडियम व्हेपरचे दिवे बसविण्यात आले होते. या दिव्यांमुळे महापालिकेला वार्षिक ३० कोटी वीजेचे बिल वीज मंडळाला भरावे लागत होते. महापालिका प्रशासनाने वीज बचत करण्यासाठी २०१४ साली सोडियम व्हेपरचे दिवे बदलून त्या ठिकाणी एलईडी दिवे लावण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील ४२ हजार १०० दिव्यांपैकी सुमारे ३२ हजार दिव्यांचे आत्तापर्यंत एलईडी दिव्यात परिवर्तन करण्यात आले, त्यामुळे महापालिकेची १२ कोटींची बचत झाली आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने या ३२ हजार दिव्यांपैकी ७५०० दिव्यांची निगा आणि देखभालीचे काम कर्नाटक स्टेट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीला सात वर्षासाठी वीज बचतीच्या बिलापोटी ९० टक्के तर महापालिकेला १०टक्के या सुत्रावर ठेका दिला आहे. या कंपनीने शहरातील विजेच्या खांबावर १३० पॅनल बसवले आहेत तसेच ७५०० एलईडी दिवे स्वखर्चाने बसवले आहेत. त्या पॅनलवरील स्विच गियर, केबल याची देखभाल दुरुस्तीही ती कंपनी करत आहे, त्यामुळेच मार्च २०१८पासून एक लाख ६८ हजार युनिटची वीजबचत झाली आहे. त्याचा त्या कंपनीला देखील आठ कोटी ६० लाख रुपये फायदा झाला आहे. त्यामधील १० टक्के नफा ठामपाला मिळाला आहे. कोरोना काळात महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली असताना या बचतीमुळे महापालिकेला दिलासा मिळाला आहे.
या बाबत विद्युत विभागाचे उपअभियंता श्री. गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एलईडी दिवे लावल्याने वीजबचत झाली आहे. मागील दोन वर्षात शहरातील १००टक्के दिवे हे एलईडीचे झाले असते तर महापालिकेचे आणखी तीन कोटी रुपये वाचले असते. कोरोनामुळे हे दिवे बदली करता आले नाहीत, परंतु काही महिन्यात आणखी काही एलईडी दिवे बसवले जातील आणि विजेची बचत होऊन महापालिकेला त्याचा उपयोग होईल.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.