पाऊस थांबताच पुन्हा एकदा ठाण्यामध्ये फेरीवाला हटाव सुरू झालं आहे. कालपासून ठाण्यामध्ये अनधिकृत फेरीवाले व बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा (Commissioner Dr. Vipin Sharma) यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत नौपाडा, कोपरी प्रभाग समितीमधील गावदेवी, तीन हातनाका, आलोक हॉटेल, हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड, तलावपाळी या ठिकाणच्या फेरीवाल्यांना हटविण्यात आले आणि स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका, कोर्ट नाका, संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, एलआयसी ऑफिस रोड, नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, कोपरी कॉलनी, भाजी मार्केट, स्टेशन रोड, नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक व मंगला हायस्कूल नाका या ठाण्यातील ठिकाणांवरील फेरीवाल्यांना हटवून सामान जप्त करण्यात आले.
महानगरपालिकेची धडक कारवाई
कळवा प्रभाग समितीमधील विठ्ठल मंदिर रोड खारेगाव या ठिकाणांवरील ९० फिट रोड, पारसिक नगर परिसरामधील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमधील खान कम्पाऊंड, दिवा पूर्व याठिकाणी सद्दाम यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. कळवा प्रभाग समितीमधील असल्फा इमारतीजवळ टाकोळी मोहल्ला येथील तळ अधिक नऊ मजली अनधिकृत इमारतीतील अंतर्गत बांधकाम निष्कासित करण्यात आले, तर लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या डवले नगर मैदानामधील कमानीचा धोकादायक भाग गॅसकटरच्या सहाय्याने तोडण्यात आला.
या परिसरातील फेरीवाले हटविण्यात आले
उथळसर प्रभाग समितीमधील नितीन कंपनी सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड (Nitin Company Service Road, Cadbury Junction Service Road) येथील अनधिकृतरीत्या नो पर्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली. तसेच वर्तक नगर प्रभाग समितीमधील जवाहर नगर, मुरली बार, आनंद बाजार, कापुरबावडी नाका, लॉकिम कंपनी, मोर मॉलच्या समोर, जी. बी. रोड हायवे सर्व्हिस रोड, म्हाडा वसाहत या ठिकाणी गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सी-१ व सी-२ (A) धोकादायक इमारतींची पाहणी करण्यात आली आहे. वर्तकनगर नाका, कॅडबरी नाका, माजिवडा नाका, वसंत विहार सर्कलपर्यंत फेरीवाले हटविण्यात आले. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या (Department of Encroachment Control and Eviction) उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, सचिन बोरसे, महेश आहेर, समीर जाधव, अलका खैरे आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.