कल्याण : पावसाळ्याच्या काळावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील महात्मा फुले रोडवरील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरू करण्यात आली.
सुनंदा निवास ही इमारत तळ +2 मजल्याची असून 1974 साली बांधलेली होती. या इमारतीमध्ये 6 भाडेकरू आणि तीन व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस 2018 पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्याचप्रमाणे चिंतामण बिल्डींग(तळ+2) ही 30 वर्षे जुनी असून त्यामध्ये 4 भाडेकरु आणि 2 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती. सदर दोन्ही इमारतींमधील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन, रहिवास मुक्त करून आज निष्कासनाची कारवाई ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे 20 कर्मचारी/कामगार, 1 जेसीबी, 1 पोकलेन, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.