ठाणे : गेल्या १० दिवसांत ठाणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत केबलवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. झाडे आणि वीजेच्या पोलवर टाकलेल्या तब्बल तीन टेम्पो भरतील एवढ्या केबल्स काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही या केबल्स पुन्हा अनधिकृतपणे जोडल्या जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात इंटरनेट तसेच इतर केबल टाकायच्या असतील तर, त्यासाठी संबंधित पुरवठादारांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशा वाहीन्या भूमीगत टाकण्यासाठीच पालिका परवानगी देते आणि त्यासाठी संबंधित पुरवठादारांकडून ठराविक शुल्क आकारते. परंतु गेल्या काही वर्षात हे शुल्क चुकवण्यासाठी अनेक पुरवठादारांनी पालिकेच्या परवानगी विनाच अशा केबलचे जाळे विणले आहे. शहरातील झाडांवर आणि विद्युत खांबावर अशा केबल टाकण्यात आल्या आहेत. या केबल तुटून काही वेळेस खाली पडतात किंवा त्या भागात लोंबकळत असतात. यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो.याबात सभागृह नेते अशोक वैती यांनी मागील महासभेत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी अशा सर्व अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
महापौरांच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेने संपूर्ण शहरात अशा केबल्सवर गेल्या १० दिवसांत कारवाई केली आहे. यामध्ये विवियाना मॉल येथील सर्व्हिस रोड,रोड नं ३३,पोखरण रोड नं १,कासारवडवली येथील मुख्य रस्ता, सावरकर नगर, उथळसर सर्व्हिस रोड, नितीन सर्व्हिस रोडवरील दोन्ही बाजू तसेच रहेजा गार्डन अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये झाडावर लटकलेल्या तसेच विद्युत पोलवर लटकलेल्या केबल्स काढून टाकण्यात आल्या असून जवळपास तीन टेम्पो भरतील एवढ्या केबल्स काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही कोणत्याच कंपनीच्या नेटवर्कमध्ये अडथळा आला नसल्याची माहिती समोर आली आहे.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.