कल्याण – सामाजिक संस्था नोंदणी करून देण्याचा बहाण्याने महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करत महिलांशी अश्लील संभाषण करणाऱ्या एका मंत्रालयातील अधिकार्याला पीडित महिलांनी चांगलाच चोप दिल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .शिवाजी आव्हाड अस या अधिकारयाच नाव आहे . धक्कादायक म्हणजे या प्रकरणी महिलांनी पोलिसांकडे दाद मागितली मात्र पोलिसांनी या अधिकार्याविरोधात एनसी दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई केली त्यामुळे पीडित महिलेने पोलिसांनी गुन्हा दाखल का केला नाही असा सवाल केला आहे .तर पोलिसांनी मात्र महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला त्याच्या बाबत आणखी काही तक्रार असेल तर तिला आज बोलावलं आहे त्यानुसार गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात येईल असे सांगितले
सदर पीडित महिला बदलापूर परिसरात राहते व एका सामाजिक संस्थेत काम करते .काही दिवसांपूर्वी मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या एका शिवाजी आव्हाड या इसमाने सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली .स्वतःची सामाजिक संस्था नोंदणी करून देतो अस सांगत तिच्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला या पीडित महिलेच्या मैत्रिणीला देखील नगरसेविका बनवतो अस सांगत तिच्याशी फोन वर अश्लील संभाषण केलं .त्यानंतर या आव्हाडने या महिलांना फोन करून कल्यानातील एका हॉटेल मध्ये भेटण्यासाठी बोलावलं .संतापलेल्या या पीडित महिलांनी त्याला त्याच हॉटेल मध्ये गाठून चांगलाच चोप दिला .याच मारहाणीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालाय .महिलांनी आव्हाड याला महात्मा फुले पोलिसांच्या स्वाधिन केलं मात्र पोलिसांनी आव्हाड विरोधात एनसी दाखल करत प्रतिबंधात्मक कारवाई केली .पोलिसांच्या कारवाई बाबत पीडित महिलेने पोलिसांनी जिथे राहता त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल करा असा सल्ला दिला पोलिसानी गुन्हा का दाखल केला नाही ? असा सवाल करत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल आहे .तर महात्मा फुले पोलिसांनी मात्र महिलेच्या तक्रारीनुसार कारवाई केली ,तिला फोन करून तक्रार केली का याबाबत विचारल होत ,पीडित महिलेला आज बोलावलं आहे तिच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असं सांगितलं मात्र कॅमरा समोर बोलण्यात नकार दिलाय .
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This Post has been retrieved from the RSS feed. contact for further details of Discussion. We do not own or take copyrights of this post.