उल्हासनगर : काही महिन्यांपूर्वी मोहिनी पॅलेस या इमारतीचे स्लॅब कोसळून पाच जणांचा तर, साई शक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा पारस अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
काल रात्री कॅम्प नंबर ५ मध्ये असलेल्या आणि धोकादायक इमारतींच्या यादीत नसलेल्या पारस अपार्टमेंट या इमारतीचा ५ व्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला. त्यात आकाश उर्फ राजा पोपटानी हा २५ वर्षीय तरुण दगावला आहे. ही घटना समजताच आयुक्त महापौर लिलाबाई आशान, शिवसेना नगरसेवक अरुण आशान, डॉ.राजा दयानिधी, मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे, महेंद्र पंजाबी, अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके, युटीए व्यापारी असोसिएशनचे कॅम्प नंबर ५ चे अध्यक्ष व परिवहन समिती सभापती दिनेश लहरानी आदींनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले असून रहिवाशांना बाहेर काढले आहे
मध्यरात्रीपर्यंत घटनास्थळी असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण इमारत खाली केली अशी माहिती मुख्यालय उपआयुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.