ठाणे : ठाण्याचे रहिवासी ज्येष्ठ गिर्यारोहक शरद कुलकर्णी ( Sharad Kulkarni ) यांनी वयाच्या 59 व्या वर्षी रशियातील सर्वात उंच असलेले माऊंट एलब्रूस शिखर सर करून नवा इतिहास घडवला.
या वयात हे शिखर सर करणारे शरद कुलकर्णी हे पहिले भारतीय असल्याचा मान त्यांना मिळाला. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अतिशय कठीण हिमवादळाला सामोरे जात शिखरावर यशस्वी चढाई केली. या आधीही 2020 साली साऊथ अमेरिकेतील ‘माऊंट आकांकागुआ ‘ शिखर सर करणारे ते पहिले वयस्कर भारतीय ठरले होते. 2014 साली एलब्रूस शिखरावरून अतिशय खराब हवामानामुळे मोहीम अर्धवट सोडून त्यांना परतावे लागले होते. पण जिद्धीने परत यावेळी पण अतिशय खराब वातावरणाला सामोरे जाऊन त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला.
ही मोहीम त्यांची स्वर्गवासी पत्नी अंजली कुलकर्णी ( Anjali Sharad Kulkarni ) यांना समर्पित केली.
त्यांचे 2019 साली एव्हरेस्ट मोहिमे दरम्यान निधन झाले होते.
या आधी शरद कुलकर्णी ( Sharad Kulkarni ) यांनी दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो, ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझियेस्को, नेपाळमधील माऊंट एवरेस्ट, मेरा पीक, लोबूचे पीक, भारतातील स्टोककांग्री, माऊंट हनुमान तिब्बा, काश्मीर मधील सनसेट पीक अशी अनेक शिखरे सर केली आहेत. उतारवयात इतर लोक निवृत्तीची भाषा करत असताना या वयातही उंचीची शिखरे सर करून आपला छंद जोपासत इतरांसमोर एक उदाहरण समोर ठेवले आहे.
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.