ठाणे: ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Thane Seventh pay Comission) मात्र ही केवळ घोषणाच ठरली असून अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
कर्मचारी अजूनही प्रतिक्षेत (Thane Seventh pay Comission)
सेवानिवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार मुंबई वगळून अन्य पालिकेतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा शासन निर्णय २ ऑगस्ट २०१९ मध्ये जाहीर झाला होता. परंतु त्याची अंमलबजावणी ठाणे महापालिकेने केली नव्हती. अखेर एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या महासभेत या संदर्भातील प्रस्ताव मंजुर करण्यात आला. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. अखेर मागील झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयाला महापालिका प्रशासनाने हरताळ फासल्याचा आरोप गुरुवारच्या महासभेत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला.

कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू करण्यासाठी काय अडचणी आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांनी वेतन आयोग लागू करण्यास सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने अद्यापही वेतन आयोग लागू करता आला नसल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु त्याला आणखी किती दिवस जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Thane Seventh pay Comission) या त्रुटी केव्हा दूर होणार आणि कर्मचाऱ्यांना या वेतनाचा लाभ केव्हा मिळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यानुसार पुढील १५ दिवसात या त्रुटी दूर करुन सातवा वेतन आयोग लागू केला जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून महासभेत देण्यात आले आहे.
स्रोत – ठाणे वैभव
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.(Join our telegram changel)
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा. (Please Download Our App)
This News post has not edited by GNP Team except the title. It has been retrieved from feed so all Copyrights belongs to RSS feed source.
If you still have issue let us know.