तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी आपल्या अभिनय कौशल्याने लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे अक्षरशः फार कमी वेळातच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली. ‘दुर्वा’ ‘फुलपाखरू’ यांसारख्या उत्कृष्ट मालिकानंतर हृताचे चाहते तिच्या नवीन मालिकाची आतुरतेने वाट पाहत होते.
झी मराठीवर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. तो पाहून प्रेक्षक आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. या मालिकेतून अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि विठूमाउली फेम अजिंक्य राऊत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
View this post on Instagram
‘मन उडू उडू झालं’असं या मालिकेचं नाव असून ही मालिका ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी भेटीला येणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com