Realme देशात मीडियाटेक डायमेंसिटी 810 प्रोसेसरसह आपला पहिला 5G फोन लाँच करणार आहे. ही घोषणा Realme आणि MediaTek ने एकसाथ केली आहे.या स्मार्टफोनचे नाव मात्र अद्यापही जाहीर केले नाही, मात्र हा एक वेगवान, दीर्घकाळ बॅटरी लाइफ आणि गेम्समध्ये जास्त FPS सह ऑल राऊंड एक्सपीरियंस देणारा फोन असेल, असे सांगण्यात आले आहे.
असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स :
- Realme 8s स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
- या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 810 चिपसेट 5G कनेक्टीव्हीसह दिला जाऊ शकतो.
- हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.
- हा नवीन रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 सह येईल.
- Realme 8s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो.
- या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
- या रियलमी फोनमधील 5 हजार एमएएचची बॅटरी 33 वॉट डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
- या फोनची प्रारंभिक किंमत 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.