मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आयपीएल (IPL 2021) स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात अजून एकही मॅच खेळलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) व कोलकाता नाईटरायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्धच्या मॅचमध्ये त्याला आराम देण्यात आला होता. त्यानंतर हार्दिकच्या फिटनेसवर (fitness) प्रश्न उपस्थित झाले आहेत. हार्दिक फिट नसेल तर त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जावे, असाही सल्ला माजी क्रिकेटपटूने दिला आहे. टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि निवड समितीचा माजी सदस्य सबा करीमने (Saba Karim) हार्दिकच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘तो मोठा खेळाडू आहे. त्याची टीम इंडियात (Team India) निवड झाली आहे, परंतु तो फिट आहे का? हा खरा प्रश्न आहे. तो फिट नसेल तर या मुद्याकडे दुर्लक्ष कसे गेले? तो दुखापतग्रस्त असूनही त्याला टीममध्ये का निवडले? कोणत्याही क्रिकेटपटूला फिटनेस सिद्ध करण्याकरिता एनसीएमध्ये जावे लागते. हा नियम सर्वांना लागू आहे,’ असेही मत सबाने व्यक्त केले.
ही सकारात्मक बाब
हार्दिक पांड्यासोबत नेमकं काय झाले आहे हे आपल्याला माहिती नाही, असे त्याने सांगितले. मुंबई इंडियन्स व टीम इंडियाचा आक्रमक ऑलराऊंडर असलेल्या हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पुढील टी-२० वर्ल्ड कपच्या (T-20 World Cup) टीममध्ये निवड झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची पहिली मॅच २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्ताविरुद्ध (Pakistan) होणार आहे. सबा करीमने यावेळी ईशान किशनच्या निवडीचे समर्थन केले. आयपीएल स्पर्धेमध्ये ईशान रन काढण्याकरिता संघर्ष करत आहे, परंतु त्याने टीम इंडियाकडून गेल्या काही मॅचमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, ही सकारात्मक बाब असल्याचे त्याने सांगितले.
लवकरच तो मुंबईकडून मैदानात खेळणार ?
मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बॉन्ड (Shane Bond) याने हार्दिक आयपीएल (IPL 2021) स्पर्धेत कधी खेळणार, या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘हार्दिकला मैदानामध्ये उतरविण्याकरिता (Waiting to put Pandya back on field) आम्हीही केव्हापासून वाट पाहत आहोत. रोहितप्रमाणेच त्याचे ट्रेनिंग (Hardik Pandya training well) अगदी चांगले चालले आहे व लवकरच तो मुंबईकडून मैदानात (Hardik might play soon) खेळताना दिसेल,’ असेही बॉन्डने सांगितले.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.