कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने जगभरामध्ये एकच हाहाकार माजवला. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेला या साथीमुळे सगळ्यात जास्त फटका बसला. आता भारतासोबत इतर देशसुद्धा यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे जास्त प्रमाणात लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, याचा परिणाम अनेकांच्या पगारावरही झाला असल्याचे पाहायला मिळाले. ही एक दिलासा देणारी बाब आहे की, देशामध्ये कोरोनाच्या प्रभावामधून सावरत आता कंपन्यांनी पुन्हा लोकांना कामावर घेण्यास सुरुवात केली आहे. कंपन्या नवीन भरतीसुद्धा करत आहेत, तसेच पगारदेखील उत्तम देत आहेत. याबरोबरच जुन्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतनवाढ मिळाली. जर आपण आरबीआयच्या केंद्रीय बँकेचा अहवाल पाहिला तर २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये कंपन्यांचा नफा परत वाढू लागला आहे.
पगारामध्ये वार्षिक वाढ आहे
अर्थव्यवस्थेसंदर्भात रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्ष २०२१-२२च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपन्यांच्या नफ्यामध्ये उत्तम वाढ होताना दिसत आहे. आरबीआयच्या अहवालाप्रमाणे, वेतन बिलामध्ये म्हणजेच पगार व भत्त्यांमध्ये सोळा क्षेत्रांमध्ये वाढ झाली. याचे मुख्य कारण म्हणजे परत कामावर घेणे व पगारामध्ये वार्षिक वाढ आहे. वेतन बिलामध्ये सर्वाधिक वाढ कापड क्षेत्रामध्ये व सर्वात कमी वाढ वाहतूक क्षेत्रामध्ये दिसून येत आहे.
सगळ्यात मोठी उडी आयटी व वाहन क्षेत्रात
आरबीआयच्या १७ ऑगस्टच्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, “गेल्या ५ तिमाहीमध्ये सातत्याने नफ्यात वाढ झाल्यामुळे पगार व भत्त्यांमध्ये कंपन्यांचा खर्चदेखील वाढला, त्यामुळे भरतीमध्ये वाढ दर्शवते. सगळ्यात मोठी उडी आयटी व वाहन क्षेत्रामध्ये दिसून आली. त्याचनुसार कापड उद्योगामधील वेतन बिल २०२१ च्या एप्रिल-जून तिमाहीमध्ये ३७.७ % नी वाढले, परंतु वाहतूक क्षेत्रामध्ये सर्वात कमी वाढ दिसून आली. ते म्हणजे १.१८ % होते.
ऑटो सेक्टरचे वेतन बिल २५.५% नी वाढले
आरबीआयच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ऑटो सेक्टर हे टेक्सटाईल सेक्टरनंतर येते. येत्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये त्याचे वेतन बिल २५.५% नी वाढले. कोरोना विषाणूनंतर वाहनांची विक्री वाढली, ज्यामुळे या क्षेत्रामध्ये नोकऱ्या वाढल्या. त्याचप्रमाणे वेतन बिलामध्ये धातू, खाण व ग्राहक सारख्या विभागामध्ये २०% हून जास्त वाढ झाली.
या पाच क्षेत्रांनी उत्तम नफा कमावला
आयटी, पॉवर, कम्युनिकेशन्स, फार्मा व एफएमसीजी ही पाच क्षेत्रे आहेत, ज्यांचे वेतन बिल आर्थिक वर्ष २०२१ च्या सर्व तिमाहीमध्ये कधीच कमी झाले नाही. आयटी क्षेत्रामधील वेतन बिल सगळ्याच तिमाही या काळात वाढतच गेले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यामध्ये १६.७% वाढ झाली. कोरोना महामारी काळात फार्मा क्षेत्राने उत्तम नफा कमावला.
दळणवळण क्षेत्राचे वेतन बिल ७.४ टक्क्यांनी वाढले
एफएमसीजी क्षेत्राचे वेतन बिल एप्रिल-जून तिमाहीमध्ये १०.६ टक्क्यांनी वाढले. महामारीमुळे वीज क्षेत्रामधील वापर कमी झाला, मात्र आर्थिक वर्ष २०२१ या काळात सर्व तिमाहीत त्याचे वेतन बिल वाढले. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ११.६% ने वाढली. त्याचनुसार दळणवळण क्षेत्राचे वेतन बिल ७.४ टक्क्यांनी वाढले.
कोरोना महामारीचा सगळ्यात वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर
परिवहन क्षेत्रामध्ये सर्वात कमी १.८ % वाढ झाली. परिवहननंतर कोरोना महामारीचा सगळ्यात वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या चार तिमाहीमध्ये त्याच्या वेतन बिलात तोटा दिसून आला होता. मात्र या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यामध्ये ४.३% वाढ झाली, जी सुधारणा दिसून येते.
अर्थव्यवस्था पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे
केंद्रीय बँक आरबीआयने आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेमध्ये पुनरुज्जीवन होण्याची चिन्हे आहेत. देशामधील १,४२७ सूचीबद्ध गैर-वित्तीय कंपन्यांनी दिलेल्या निकालांप्रमाणे, जून तिमाहीत त्यांची विक्री वर्ष-दर-वर्षाच्या आधारे ५७% नी वाढली. गेल्या वर्षी याच कालावधीत त्यामध्ये ३४% घट झाली होती. देशाची अर्थव्यवस्था परत वेग घेईल, अशी अपेक्षा आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.