मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात जी हिंसा आणि दंगल उसळली त्याच्या पाठीमागे अतिरेकी संघटना रझा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शांतता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात आणि सरकार बसून राहतं, बघत बसतं. सरकारनं एक तर यांच्यावर बंदी घालावी अन्यथा महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून दिला आहे.
त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती, नांदेड, भिवंडीसह मालेगाव परिसरातील मुस्लिमांनी मोर्चे काढले. त्यामुळे जमाव हिंसक झाला आणि त्याचे पर्यवसान दंगलीत झाले. त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, पोलीसांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. बघता बघता महाराष्ट्राच्या काही शहरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. भिवंडी-नांदेडमध्ये रझा अकादमीच्याच काही तरुणांनी कायदा हातात घेऊन दगडफेक केल्याचा आरोप आहे. नांदेडच्या एसपींनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
स्रोत: रत्नागिरी खबरदार
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.