स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी या दुर्मीळ आजाराशी लढा देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदेने आज जगाचा निरोप घेतला. वेदिकाच्या पालकांकडे उपचारासाठी पैसे नसल्यानं त्यांनी सोशल मीडियावर मदतीचं आवाहन केलं होतं. उपचारासाठी 16 कोटी रुपयांच्या औषधाची गरज असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी या पोस्टला तुफान प्रतिसाद देत तब्बल 16 कोटी रुपये जमा केले होते.
वेदिकाच्या आजारावर 16 कोटींचं इंजेक्शन हा एकच पर्याय होता. वेदिकासाठी अख्खा देश एकत्र आला. यामध्ये अभिनेते, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसेवक यांनीही मदत करत आणखी मदतीसाठी आवाहन केलं. अखेर 16 कोटी रक्कम जमा झाली आणि वेदिकाला ते औषध मिळालेलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रविवारी अचानक तिची प्रकृती खालावली. त्यानंतर तिने जगाचा निरोप घेतला. तिचे वडिल सौरभ शिंदे यांनी याची माहिती दिली आहे.
या बातमीनंतर नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. वेदिकाच्या आई-वडिलांनी तिचं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं होतं. यावर त्यांनी तिच्या जाण्याअगोदरचे काही व्हिडीओ पोस्ट केले होते. यामध्ये ती खेळताना दिसत आहे.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.