मुंबई : ज्या राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक केसेस असणारे नेते भाजपचे आहेत असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. राज्यसरकार गुंड व पोलिसांच्या जीवावर चालते असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला असून त्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मोदीजी व अमित शहाजी हे ज्या पध्दतीने गुजरातमध्ये सरकार चालवत होते. त्यांच्या सरकारमध्ये पुरुषोत्तम सोलंकी नावाचा दाऊदचा हस्तक होता त्याला मंत्री केले होते. ज्यांच्यावर टाडा लावला होता त्यांना मोदींजी मंत्री करत होते आणि आजही मोदींच्या कॅबिनेटमध्ये असे लोक आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. भाजपशासित राज्यातही ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत असेही लोक आहेत याची आठवणही नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना करुन दिली आहे.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.