बहुचर्चित चित्रपट ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली होती. हा चित्रपट ९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.आता या चित्रपटाची नवी तारीख समोर आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख सांगितली आहे. ‘चेहरे चित्रपट २७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी व्हिडीओ शेअर करत दिले आहे.
‘चेहरे’चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे.अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार आहे.
Credits and Copyrights – lokshahinews.com