शाओमी रेडमी कंपनीचा नवा RedmiBook 15 हा लॅपटॉप (Laptop) लवकरच भारतात सादर होत आहे. मात्र त्यापूर्वीच त्याची वैशिष्ट्यं (Features) आणि किंमत ही माहिती लीक झाली आहे. शाओमीचा सब-ब्रँड रेडमी भारतात आपला पहिला लॅपटॉप सादर करण्यासाठी तयारी करत आहे.
3 ऑगस्टला रेडमी भारतात RedmiBook सीरिज सादर करणार आहे. या लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन टायगर लेक प्रोसेसर असेल आणि हा लॅपटॉप चारकोल ग्रे रंगामध्ये उपलब्ध असेल, असा दुजोरा कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. एका वृत्तानुसार, भारतात RedmiBook ची वैशिष्ट्यं आणि किंमत ही माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रेडमी 15.6 इंचाचा डिस्प्ले आणि पूर्ण एचडी रेझिल्युशन (Full HD Resolution) असलेला लॅपटॉप लाँच करणार आहे. हा लॅपटॉप एक एलसीडी सपोर्ट पॅनेलसह असेल.
हा लॅपटॉप 11 जनरेशनच्या कोअर आय 3 (CORE i3) आणि कोअर आय 5 व्हॅरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह उपलब्ध होईल. हा लॅपटॉप PCle SSD आणि 256GB आणि 512GB अशा आणखी दोन पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
The above contain is retrieved from RSS feed. We do not hold copyrights of it. If someone has problem with content provided us genuine evidence and take it down.