सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिषदेची शिक्षक पात्रता TET परीक्षा १० ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबरला होणार आहे. (TET Exam Date) कोरोना कालावधीमुळे गत दीड वर्षापासून ही परीक्षा झालेली नाही. लाखो बी.एड. पदवीधारक तिच्या प्रतीक्षेत आहेत. ही परीक्षा व यूपीएससीची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने दहा ऑक्टोबरची टीईटीची तारीख शासनाने बदलली. याविषयी सरकारला निवेदन दिले होते, अशी माहिती प्रयास संस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी दिली. टीईटी व केंद्रीय लोकसेवा आयोगाची यूपीएससी पूर्व परीक्षा एकाच दिवशी येत होती. त्यामुळे तारीख बदलण्याची मागणी निवेदनात केली होती.
This Post has been Retrieved from RSS feed. We do not claim the copyright of this post.