प्रभासचा बहुचर्चित ‘राधेश्याम’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता प्रभासने आपल्या सोशल मिडीयावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ज्यात तो युरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत असून हा चित्रपट येत्या मकरसंक्रांतीला म्हणजेच १४ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात प्रभास रोमांटिक शैलीत दिसत आहे. चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे यांची जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले असून प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.
‘राधेश्याम’ हा एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी सिरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही युवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.
Credits and Copyrights – Streams7news.com