२०२० मध्ये अनेक वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या आहेत. यंदाच्या वर्षात त्या सुपरहिट वेबसीरिजचे पुढील भाग प्रदर्शित होणार असून, त्याची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. याव्यतिरिक्त नवीन वेबसीरिजही धमाका करण्याकरिता तयार आहेत. ‘असूर २’ ही वेबसीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून, असूरच्या पहिल्या सिझनला चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला होता. आता असूरचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘कोड मी २’ ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत.
‘दिल्ली क्राइम २’ देशामधील सर्वोत्कृष्ट वेबसीरिज दिल्ली क्राइमने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज २०१२ मधील दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. आता या बेवसीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. ‘मसाबा मसाबा ‘ ही वेब सीरिज नीना गुप्ता नावाच्या मुलीवर आधारित असून, या वेबसीरिजचा पहिला भाग प्रचंड गाजला होता.
‘फाइंडिंग अनामिका’ या वेबसीरिजमध्ये माधुरी दीक्षित, संजय कपूर मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत, तर अभिनेता संजय कपूर आता माधुरीबरोबर पुन्हा एकत्र दिसणार आहे. ‘कोटा फॅक्टरी २’ च्या पहिल्या भागामध्ये ही वेबसीरिज चाहत्यांना फारच आवडली होती. आता या वेबसीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘ये काली काली आंखे’मधून श्वेता त्रिपाठी चाहत्यांच्या भेटीला येणार असून, ही वेब सीरिज आपल्याला नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार आहे. ‘रुद्र’ अभिनेता अजय देवगण रुद्र वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसणार असून, त्याचीही वेबसीरिज हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये अजय देवगणसह इलियानादेखील दिसणार आहे.

‘लिटल थिंग्स’ ही वेबसीरिज एकूणच लव्ह स्टोरीवर आधारित असून, लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची वाट बघत आहेत. ‘हुश हुश’ या वेबसीरिजमध्ये जुही चावला मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. ॲमेझॉन प्राईमवर ही वेबसीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक मिसमॅच्ड या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या बेवसीरिजमध्ये रोहित सराफस, प्रांजली कोळी मुख्य भूमिका साकारत आहेत.
येथे क्लिक करून आमच्या (Koo) कू प्रोफाइलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनेलमध्ये सामील व्हा.
येथे क्लिक करून आमचे न्यूज अॅप डाउनलोड करा.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.