भाजपचे आमदार आशिष शेलार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असलेली मैत्री जगजाहीर आहे. ‘
“राज ठाकरे यांच्यासोबतच्या मैत्रीचे पूर्णपणे श्रेय हे राज ठाकरे यांना जाते, कारण मला आजदेखील वाटते की, राज ठाकरे यांच्याकडून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. विद्यार्थी क्षेत्रामध्ये काम करताना आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो. मी एक साधा चळवळीतला एक कार्यकर्ता होतो. त्यानंतर मात्र जसजसे आम्ही काळानुरूप प्रगती करत गेलो त्यानंतर आमचा संवाद वाढला व त्या संवादामधूनच मैत्रीचे नाते बनले पाहिजे होते. ते बनवले व स्वीकारले फक्त राज ठाकरेंमुळे. पुढे मैत्रीचे नाते आणखी वाढले आणि घट्टही झाले. मी आजही त्यांच्याकडून बर्याच काही गोष्टी शिकतो”, असेही आशिष शेलार म्हणाले.
राज ठाकरे यांच्यासोबतच्या स्नेहासंदर्भात बोलताना आशिष शेलार यांनी त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक प्रसंगसुद्धा यावेळी सांगितला. “मी मुद्दाम यावेळी उल्लेख करेन की, माझी आई ज्यावेळी गेली त्यावेळी राज ठाकरे अर्धा-पाऊण तास खाली उन्हामध्ये माझ्याकरिता थांबले होते. मला तुलना करायची नाही अथवा काही अर्थसुद्धा काढायचा नाही, परंतु मी हे सुद्धा विसरू शकणार नाही की, त्यावेळेला पुढच्या आठवड्याभराच्या वेळात माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रंगशारदामध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख एकदा नाही दोनवेळा कार्यक्रमाकरिताही आले, परंतु ते घरी आले नाहीत. त्यांची मर्जी, ते आले नाहीत. त्यांनी फोनसुद्धा केला नाही, एसएमएसदेखील केला नाही अथवा संवेदनाही व्यक्त केल्या नाहीत. माझ्या आईकरिता त्यांनी त्या व्यक्त केल्या पाहिजे होत्या असा माझा आग्रहही नाही, परंतु मी हे विसरणार नाही”, असे आशिष शेलार म्हणाले.
This News post has been retrieved from RSS feed, We do not claim its copyrights or credits. If you wish have credits contact us.